For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.54 लाख कोटींची वाढ

06:08 AM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 54 लाख कोटींची वाढ
Advertisement

आयटी कंपनी टीसीएसच्या भांडवलात मोठी वाढ, लार्सन टुब्रोच्या मूल्यात घसरण

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

शेअरबाजारातील आघाडीवरच्या 10 कंपन्यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास 5 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकत्रितपणे मागच्या आठवड्यात 1.54 लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. यात आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचे भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले.

Advertisement

मागच्या आठवड्यात बाजाराची कामगिरी पाहिल्यास सेन्सेक्स 582 अंकांनी वाढला होता तर निफ्टी 127 अंकांनी वाढला होता. मागच्या आठवड्यात बाजाराने बऱ्यापैकी सुधारणा केल्याचे दिसले. भूराजकीय तणाव, व्रुड तेलाच्या किमतीत झालेली वाढ, रुपया घसरणीत सारख्या घटनांचा बाजारावर दबाव होता. टीसीएसने 10 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँक, एसबीआय व बजाज फायनान्स यांच्या मूल्यात मागच्या आठवड्यात वाढ झाली होती. पण दुसरीकडे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एलआयसी, लार्सन टुब्रो व हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे मूल्य मात्र घसरलेले दिसून आले.

टीसीएसच्या मूल्यात 72,072 कोटींची भर पडली असून त्यांचे बाजार भांडवल मूल्य 8 लाख 20 हजार 672 कोटींवर पोहचले आहे. जूनतिमाहीत कंपनीने 4 टक्के वाढीसह 13349 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. आयसीआयसीआय बँकेचे मूल्य मागच्या आठवड्यात 29 हजार 62 कोटींनी वाढत 10 लाख 34 हजार 441 कोटी रुपयांवर पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल मूल्य 23,884 कोटींनी वाढत 17 लाख 95 हजार 91 कोटींवर पोहचले आहे. सोबत बजाज फायनान्सचे मूल्य 21,946 कोटींनी वाढीसोबत 6 लाख 57 हजार 274 कोटींवर तर एसबीआयचे बाजार मूल्य 7338 कोटींसह वाढत 9 लाख 63 हजार 768 कोटींवर पोहचले.

यांच्या मूल्यात झाली घसरण

दुसरीकडे लार्सन टुब्रोचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 18097 कोटींनी कमी होत 5 लाख 24 हजार 840 कोटींवर घसरले. एलआयसीचे मूल्यही याचदरम्यान 12080 कोटींनी कमी होत 5 लाख 48 हजार 124 कोटींवर खाली आले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल 7706 कोटींसह कमी होत 11 लाख 91 हजार 67 कोटींवर स्थिरावले.

Advertisement
Tags :

.