For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.25 लाख कोटींची घसरण

06:42 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 25 लाख कोटींची घसरण
Advertisement

रिलायन्स, एलआयसीचे मूल्य सर्वाधिक घसरले, सेन्सेक्स 428 अंकांनी होता नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या दहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.25 लाख कोटी रुपयांनी कमी झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे झाले असल्याचे समजते. दहापैकी चार कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकत्रितरित्या 1 लाख 25 हजार 397 कोटी रुपयांनी घटलेले पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 428 हून अधिक अंकांनी मागच्या आठवड्यामध्ये घसरला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास 111 अंकांनी घसरणीत राहिला होता.

Advertisement

यांच्या मुल्यात घसरण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 74,969 कोटी रुपयांनी कमी होत 16 लाख 85 हजार 998 कोटी रुपयांवर राहिले. विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 21,251 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 19 हजार 472 कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 17626 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 64 हजार 304 कोटी रुपयांवर राहिले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 11 हजार 549 कोटी रुपयांनी घसरण होत 8 लाख 53 हजार 945 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.

यांच्या मूल्यात वाढ

काही कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य घसरलेले असले तरी काही कंपन्यांचे बाजारमूल्य मात्र मागच्या आठवड्यात वाढलेले दिसून आले. त्यामध्ये दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 24 हजार 934  कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 78,612 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याचप्रमाणे आणखीन एक आयटी कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 9262 कोटी रुपयांनी चढत 15 लाख  1 हजार 976 कोटी रुपयांवर पोहोचले. टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा मागच्या आठवड्यात 9398 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 36 हजार 413 कोटी रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा 9828 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 61 हजार 627 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य तसेच आयटीसीचे बाजार भांडवलदेखील शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात वाढले होते.

रिलायन्स आघाडीवरच..

बाजार भांडवलात आघाडीवर रिलायन्स इंडस्ट्रिज हीच राहिली आहे. यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एलआयसी यांचे स्थान आहे.

Advertisement
Tags :

.