6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 75 हजार कोटांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअरबाजारातील आघाडीवरच्या दहा पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात 75258 कोटी रुपयांनी वाढली होती. यामध्ये टीसीएस या आयटी क्षेत्रातील कंपनीच्या बाजार भांडवल मूल्यात सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळाली.
यांच्या मूल्यात झाली वाढ
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 22595 कोटीने वाढत 11.88 लाख कोटी तर इन्फोसिसचे मूल्य 16972 कोटीने वाढत 6.81 लाखssssssssssssssssss कोटीवर पोहोचले. या खेरीज स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 15923 कोटींनी वाढत 9.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मूल्यात 12315 कोटींनी वाढ होत 21.18 लाख कोटी, भारतीय एअरटेलचे मूल्य 7384 कोटीनी वाढत 11.95 लाख कोटी वर पोहोचले.
यांच्या बाजारमूल्यात घसरण
दुसरीकडे एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य सदरच्या आठवड्यात 21920 कोटीनी कमी होत 15.17 लाख कोटींवर घसरले. एलआयसीचे मूल्य 9614 कोटींनी कमी होत 5.39 लाख कोटींवर आणि आयसीआयसीआय बँकेचे मूल्य 8428 कोटी रुपयांनी कमी होत 9.68 लाख कोटींवर घसरले. बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 5880 कोटी रुपयांची कमी होत 6.27 लाख कोटींवर राहिले होते.