For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

औषध, आयटीच्या कामगिरीने दुसऱ्या दिवशीही बाजारात उत्साह

06:23 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
औषध  आयटीच्या कामगिरीने   दुसऱ्या दिवशीही बाजारात उत्साह
Advertisement

सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला : शेवटच्या क्षणी बाजार तेजीसह बंद

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी हालचाल दिसून आली. सकाळच्या संथ सुरुवातीनंतर, दिवसअखेरीस बाजारात तेजी दिसून आली. प्रमुख निर्देशांक सुमारे अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजीचे वातावरण राहिले होते. दरम्यान यात सर्वाधिक खरेदी आयटी आणि फार्मा क्षेत्रात नोंदवली गेली.

Advertisement

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 308.49 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 74,459.53 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 116.35 अंकांच्या तेजीसह 23,053.10 वर बंद झाला आहे. दरम्यान निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्सनी वाढ नोंदवली होती. तर 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले. ट्रेंटचा शेअर 5.4 टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांकात सर्वाधिक वाढलेला शेअर ठरला. इंडिगो आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. त्याच वेळी, श्रीराम फायनान्सचा शेअर 2.13 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरलेला शेअर ठरला.

बाजारात आयटी आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक खरेदीची नोंद झाली. एनएसईवर, निफ्टी आयटी निर्देशांक 2.3 टक्क्यांनी वाढून बंद झाला. फार्मा निर्देशांक 1.5 टक्क्यांनी वाढला. तर ऑटो, एफएमसीजी, रिअल्टी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जोरदार विक्री झाली. व्यापक बाजारातही विक्रीची लाट नोंदवली गेली. स्मॉलकॅप निर्देशांक 1.85 टक्क्यांच्या आणि मिडकॅप निर्देशांक 0.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

व्होलॅटिलिटी इंडेक्स इंडिया 1.25 टक्क्यांनी वाढून 15.13 वर बंद झाला. पुढील आठवड्यासाठी शेअर बाजाराचा दृष्टिकोन व्हेंचुराचे संशोधन प्रमुख विनीत बोलिंगकर यांच्या मते, पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मर्यादित प्रमाणात चढ-उतार दिसून येऊ शकतात. कंपन्यांच्या तिमाही निकालांमुळे बाजाराला आधार मिळू शकतो, परंतु जागतिक आर्थिक आव्हानांमुळे गुंतवणूकदार सावध राहणार असल्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची खरेदी-विक्री, जागतिक व्याजदरांचे कल, कच्च्या तेलाच्या किमती आणि बॉण्डवरील परतावा यावर लक्ष ठेवून असतील. देशांतर्गत पातळीवर, कंपन्यांचे तिमाही निकाल, आर्थिक आकडेवारी आणि बाजारातील रोख रकमेची उपलब्धता यावरून वैयक्तिक शेअर्सची हालचाल निश्चित होईल.

‘या’ क्षेत्रांबद्दल

बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र बाजाराला स्थिर करू शकतात. त्याच वेळी, जोखीम टाळणारे गुंतवणूकदार आयटी आणि फार्मा सारख्या क्षेत्रांकडे वळू शकतात. याशिवाय, ऑटोमोबाईल, पायाभूत सुविधा आणि भांडवली वस्तू क्षेत्रे देखील गुंतवणूकदारांच्या नजरेत राहतील.  सणासुदीच्या काळात वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी जोरदार आहे.

Advertisement
Tags :

.