For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन, बँकिंग व रिलायन्सच्या कामगिरीमुळे बाजाराला चालना

06:58 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहन  बँकिंग व रिलायन्सच्या कामगिरीमुळे बाजाराला चालना
Advertisement

सेन्सेक्स 918 अंकांनी  मजबूत तर निफ्टी 24,050 वर बंद : आशियाई बाजारातही उत्साह

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

चालू आठवड्यात अंतिम सत्रात शुक्रवारी आशियाई बाजारांमधील सकारात्मक ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजार शेवटच्या सत्रात सकारात्मकतेने बंद झाला. बँकिंग आणि निर्देशांकातील अव्वल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीसह वाहन समभागांमुळे बाजाराला आधार मिळाला. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव अजूनही जास्त असल्याने, गुंतवणूकदारही सावध आहेत. त्याच वेळी, आयटी स्टॉक्समधील विक्रीचा बाजाराच्या सुधारणेवर नकारात्मक परिणाम झाला.

Advertisement

बीएसई सेन्सेक्स 77,198 अंकांवर मजबूत स्थितीत उघडला, अंतिम सत्रात सेन्सेक्स 918.60 अंकांच्या वाढीसह 77,550.25 अंकांवर बंद झाला. याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी अंतिम क्षणी 275.50 अंकांच्या  वाढीसह 24,050.60 बंद झाला. सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये, एशियन पेंट्स 3.84 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजीत राहिला आहे. यासह आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडिगो, एसबीआय, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, ट्रेंट लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स हे प्रमुख समभाग तेजीत राहिले होते. दुसरीकडे, सन फार्मा, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

जागतिक बाजारपेठांची स्थिती

आशियातील बहुतेक बाजारपेठांमध्ये तेजी दिसून आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी सुमारे 2.18 टक्क्यांनी सर्वाधिक वाढला. त्याचवेळी, जपानचा निक्केई 225 सुमारे 1.78 टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग 1.11 टक्क्यांनी वधारला होता. यावरून हे स्पष्ट होते की जागतिक संकेत सध्या सकारात्मक आहेत.

गुरुवारी अमेरिकन बाजारपेठादेखील तेजीसह बंद झाल्या.

यावेळी एस अँड पी 500 सुमारे 0.62 टक्क्यांनी, डाऊजोन्स 0.58 टक्क्यांनी आणि नॅस्डॅक 0.83 टक्क्यांनी वाढून बंद झाले. गुंतवणूकदार अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या शस्त्रसंधीवर लक्ष ठेवून आहेत, जी अजूनही थोडी नाजूक मानली जात आहे.  कमोडिटी बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रेंट क्रूड किमतीत वाढ झाली आहे. त्याची किंमत 0.58 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल सुमारे 96.44 डॉलरवर स्थिरावली. सौदी अरेबियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि पश्चिम आशियातील तणावामुळे हे घडले आहे.

Advertisement
Tags :

.