For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रिलायन्स-इन्फोसिस’च्या कामगिरीने बाजारात

06:59 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रिलायन्स इन्फोसिस’च्या कामगिरीने बाजारात
Advertisement

निफ्टी 69 अंकांनी वधारला : जागतिक स्तरावर मिळताजुळता कल

Advertisement

मुंबई

: भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे वधारुन बंद झाले. यामध्ये जागतिक पातळीवरील राहिलेला मिळताजुळता कल याचा लाभ हा बाजाराला झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांच्यासारख्या मुख्य कंपन्यांच्या समभागात लिलाव झाल्याने बाजारात चमक राहिली होती.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 267.75 अंकांसोबत निर्देशांक 0.36 टक्क्यांसोबत 74,221.06 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर  68.75 अंकांच्या तेजीसह 0.31 टक्क्यांसोबत निर्देशांक 22,597.80 वर बंद झाला आहे.

अन्य घडामोडींचा विचार करता बाजारात अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक होणार असल्याच्या संकेतामुळे भारतीय बाजारात सकारात्मकता दिसून आली आहे. कंपन्यांचे तिमाही अहवाल व निवडणुकीचे निकाल या संदर्भात असणाऱ्या अनिश्चितेचे वातावरण कमी होत असल्याने बाजारात सकारात्मकता वाढली आहे. याचा परिणाम हा भारतीय बाजारात झाला आहे.

मान्सूनचा सकारात्मक कल

विविध घटनांपैकी आता राज्यासह देशात यंदा लवकरच मान्सून सक्रिय होणार आहे. यामुळे दररोजच्या वापरातील साहित्यांची निमॅती करणाऱ्या कंपन्यांसह अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा कल राहणार आहे. याचाही आगामी काळात फायदा होणार असल्याचे अभ्यासकांचे संकेत आहेत.

मुख्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एशियन पेन्ट्स, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारतीय स्टेट बँक, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील तसेच टाटा मोर्ट्स यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. चीनचा शांघाय कम्पोझिट वधारला आहे, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की हे नुकसानीत राहिले.

Advertisement
Tags :

.