कुटकोळीत साडेतीन लाखांचा गांजा जप्त
कवठेमहांकाळ :
कुकटोळी येथे ऊसाच्या शेतात लावलेली सुमारे साडे तीन लाख रुपयांची गांजाची झाडे कवठेमहांकाळ पोलिसांनी जप्त केली तसेच संशयित आरोपीस तात्काळ अटक केली. पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील आणि त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईने बेकायदा धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
याबाबत माहिती अशी की कुकटोळी येथे सुदाम गुंडा निकम वय ५३ या इसमाने ऊसाच्या शेतात गांजा लावल्याची खबर निरीक्षक जोतिराम पाटील यांना मिळताच पोलीस कर्मचारी श्रीमंत तुकाराम करे यांना खबर पक्की असल्याची खात्री करून घ्या असे आदेश दिले त्यानुसार करे यांनी गुप्त माहिती मिळवली व पोलीस निरीक्षक पाटील यांना खबर दिली.
पाटील यांनी आपल्या कर्मचायांसह निकम यांच्या शेतावर शनिवारी सायंकाळी छापा मारला व गांजाची झाडे जप्त केली. या झाडांची किंमत सुमारे ३,३६३०० रुपये असून ही झाडे जप्त करून सुदाम निकम यास अटक केली आहे. सुदाम निकम यांनी बिनपरवाना गांजा या अमली पदार्थांच्या झाडाची लागवड केली त्यानुसार निकम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षका रितू खोकर, डी बाय एस पी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील यांनी छापा घातला. त्यांना सपोनी दत्तात्रय कोळेकर पोलीस कर्मचारी निवृत्ती कारंडे स्वप्निल पाटील सुभाष पडळकर, अभिजित कासार यांनी सहकार्य केले.