For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूरात गांजा विक्रीचा पर्दाफाश, 2.25 किलो गांजासह एकास अटक

04:38 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूरात गांजा विक्रीचा पर्दाफाश  2 25  किलो गांजासह एकास अटक
Advertisement

                            कोल्हापुरात गांजा जप्त

Advertisement

कोल्हापूर : राजारामपुरी येथील मातंग वसाहत येथे घरामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गांज्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये आदित्य किरण अवघडे (वय १९ रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याला अटक करुन २ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सोमवारी सकाळी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजारामपुरी येथील मातंग वसाहतीमध्ये एका घरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील व संतोष बरगे यांना मिळाली.

Advertisement

यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी सकाळी आदित्य अवघडे याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून गांजा मिळत असल्याची खात्री केली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघडे याच्या घरावर छापा टाकला. यावेळी एका पिशवीमध्ये २ किलो २५० ग्रॅम गांजा लपविल्याचे दिसून आले. पोलिसांनी गांजा जप्त करुन अवघडे याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सहा महिन्यापूर्वी वडीलांवर पण गुन्हा आदित्य अवघडे हा गांजा विक्रीमध्ये पहिल्यांदाच समोर आला आहे. मात्र त्याच्या वडीलांवरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. आदित्यचे वडील किरण यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Advertisement
Tags :

.