For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कोल्हापुरात गांजा रॅकेटचा पर्दाफाश; कुख्यात गुन्हेगाराच्या आईसह मैत्रीण अटकेत

05:49 PM Aug 28, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात गांजा रॅकेटचा पर्दाफाश  कुख्यात गुन्हेगाराच्या आईसह मैत्रीण अटकेत
Advertisement

कोल्हापूर : राजारामपुरीतील काटकर कॉलनी येथील गांजा कारवाईत अटक करण्यात आलेल्या दोन महिला या मोक्का कायद्याखाली अटकेत असलेला कुख्यात गुन्हेगार गेंड्या उर्फ ऋषिकेश चौगुले याची आई व मैत्रीण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुनिता बाबासो चौगुले, (वय ५१, रा. नवशा मारुती मंदिरजवळ, शाहूनगर) आणि स्नेहल संजय चौगुले, (वय २७, रा. विजय बेकरीजवळ, दौलतनगर, राजारामपुरी) अशी त्यांची नावे असून या दोघी याप्रकरणात अटकेत असलेल्या अनिकेत चौगुले यास गांजा खरेदी करण्यासाठी पैशांचा पुरवठाकरत होत्या आणि त्यातून मिळणारे उत्पन्न घेत होत्या, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement

२१ ऑगस्ट रोजी राजारामपुरी पोलिसांना महादेव मंदिराजवळ, काटकर कॉलनी येथे राहणारा अनिकेत संतोष चौगुले (वय २०) याच्याकडे २ किलो ५३७ ग्रॅम वजनाचा ५०,७४० रुपये किमतीचा गांजा मिळाला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कारवाईत ५०,७४० रुपयांचा गांजा, १ लाख २० हजार रुपये किमतीचा आयफोन १७ प्रो मॅक्स मोबाईल आणि ५०० रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण १ लाख ७१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील नशामुक्त अभियांतर्गत गांजा विक्री, सेवन, पुरवठा व त्यासाठी आर्थिक रसद पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे यांनी अनिकेतला गांजा खरेदीसाठी पैसे कोणी पुरवले याचा तपास केला असता दोन महिलांची नावे समोर आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.