For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मर्डे ग्रामपंचायत लिपिक महेश खोत यांचे निधन

05:07 PM May 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मर्डे ग्रामपंचायत लिपिक महेश खोत यांचे निधन
Advertisement

मसुरे : प्रतिनिधी

Advertisement

मसुरे टोकळवाडी येथील रहिवासी महेश अच्युत खोत ( 53) यांचे मंगळवारी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी दुपारी मर्डे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.महेश खोत हे बंटी या टोपणनावाने ओळखले जात होते. मर्डे ग्रामपंचायत मध्ये लिपिक या पदावर ते कार्यरत होते . सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शूटिंग बॉल खेळामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने होलमसुरा संघाचे नेतृत्व केले होते. महेश हे उत्कृष्ट क्रिकेटपटू ,नाट्यकलाकार, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते शालेय आणि कॉलेज जीवनात भालाफेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत त्यांनी यश मिळवले होते. शांत, संयमी आणि सर्वांना मदत करणारे अशी त्याची गावामध्ये ओळख होती. सुंदर हस्ताक्षरामुळे अनेक शासकीय कामांमध्ये त्यांच्या लेखणीचा वापर केला जात होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, भावजय,काका, काकी, मेहुणा ,चुलत भाऊ, बहिणी, असा मोठा परिवार असून मसुरे वाचन मंदिरचे ग्रंथपाल विजय गिरकर यांचे ते भाऊजी तर इलेक्ट्रिकल इंजिनियर सायोज्यता खोत यांचे ते वडील आणि निवृत्त शिक्षक भाऊ खोत यांचे बंधू होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.