For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कामगारांच्या मागण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा 

04:52 PM Sep 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
बांधकाम कामगारांच्या मागण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा 
Advertisement
दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना 20 हजार रुपये   देण्याची मागणी 
कोल्हापूर  प्रतिनिधी
 बांधकाम कामगारांना यावर्षी दिवाळीपूर्वी 20 हजार रुपये दिवाळी भेट दया, तपासणी ते उपचार या योजनेमध्ये आई - वडिलांचा समावेश करा, नोंदणी, नूतनीकरण,आणि लाभाची स्लॉट पद्धत बंद करा, भांडी सेट देताना आप परभाव थांबवा या व अन्य मागण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि बांधकाम कामगार फेडरेशन सिटूचे भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भरमा कांबळे म्हणाले, बांधकाम मंडळाकडे हजारो कोटी रुपये शिल्लक असताना सुद्धा या सरकारने गेल्या चार वर्षात बांधकाम कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी काहीही दिलेले नाही. तपासणी ते उपचार या योजनेत एका कामगारांचे रक्त तपासायला 3900 रुपये असे घरातील चार लोकांच्या रक्ताची तपासणी केली जाते. यातून कंपनी प्रचंड कमाई करते. मात्र या योजनेमध्ये बांधकाम कामगारांच्या आई वडिलांचा समावेश केला जात नाही.  कामगारांचा कोणत्याही लाभाचा अर्ज आज अपडेट मारला तर त्यामध्ये पडताळणीसाठी 13 महिन्यांची तारीख मिळते. घरबांधणी योजना  फक्त दीड लाख रुपयांची आहे. मंत्री महोदयांनी साडेचार लाख रुपये घोषित करून दोन वर्षे झाली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कामगाराचा मृत्यू  झाल्यावर त्याचे विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट मागितले जाते.बीओएसी  आणि डब्ल्यूएफसी कार्यालयात एजंटचे काम लवकर होते. मात्र युनियनच्या कामगारांना तिष्ठत ठेवले जाते.  जुन्या कामगारांचे नूतनीकरणाचे अर्ज तपासणीला मुंबईला जातात.  अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर होऊन वर्षपिक्षा जास्त काळ होऊन सुद्धा त्यांचे खात्यात पैसे आलेले नाहीत.  जिह्यातील अनेक गावातील ग्रामसेवक काम केल्याचा दाखला कामगारांना देत नाहीत.  इंजिनीरिंगचे अनेक कोर्स आहेत मात्र त्यातील काही मंडळाच्या यादीत नाहीत. या प्रश्नाबाबत मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी गेल्या वर्षभरात या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.अशा अनेक प्रश्नासाठी आणि ते सोडवण्यासाठी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात राज्यातून हजारो कामगार सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, एम.एच.शेख, प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, दिलीप माने, बापू कांबळे, नूरमहमद बेळकुडे,रमेश निर्मळे,संतोष राठोड उपस्थित होते.
50 टक्के बोगस कामगार
बांधकाम कामगार कल्याण मंडळ बांधकाम कामगारासाठी आहे.पण बांधकाम कामगार नोंदणीत प्रचंड बोगसगिरी सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून स्वार्थासाठी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात साडेतीन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. त्यामध्ये 50 टक्के म्हणजे जवळपास दीड लाख कामगार बोगस असून सर्वाधिक संख्या कागल तालुक्यातील आहे असे भरमा कांबळे,शिवाजी मगदूम यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement

.