महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयकॉनिक क्लबतर्फे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

06:12 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जुने बेळगाव येथील आयकॉनिक अॅकॅडमी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सिद्धार्थ नणदी, स्नेहल नाईक, अथर्व चिगरी, प्रतीक्षा कुरबर, नामदेव शिंदे, अक्षरा मजुकर, प्रथमेश परमेकर यांनी विजेतेपद पटकाविले.

Advertisement

या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून अमर बाळेकुंद्री, मनोहर गडद, योगेश, संदीप पाटील, बंडू सामजी, रेश्मा भरमुचे, जितेंद्र चौगुले, संदीप खन्नुकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सदर स्पर्धा पुरुष व महिला खुला गट, 12, 14, 16 वर्षांखालील मुला, मुलींसाठी घेण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्या 12 वर्षांखालील गटात सिद्धार्थ नणदीने प्रथम, स्वराज्य आनंदाचेने द्वितीय, प्रणव बेनकेने तृतिय, मुलींच्या गटात स्नेहल नाईक-प्रथम, भक्ती गुरव-द्वितीय, प्रांजल धुडूम-तृतिय, 14 वर्षांखालील गटात मुलांमध्ये अथर्व चिगरी-प्रथम, सुरज खोत-द्वितीय, अथर्व नाईक-तृतिय, मुलींच्या गटात गौरी पुजारी-प्रथम, शिवानी शेलार-द्वितीय, प्रतीक्षा कुरबर-तृतिय, 16 वर्षांखालील गटात मुलांमध्ये नामदेव शिंदे-प्रथम, ओमकार बी.-द्वितीय, मोहन पाटील-तृतिय, मुलींच्या गटात अक्षरा मजुकर-प्रथम, वैष्णवी कामाण्णाचे-द्वितीय, प्रतिज्ञा मोहीते-तृतिय क्रमांक पटकाविला.

खुल्या खटात पुरुष विभागात प्रथम परमेकर-प्रथम, आनंद गावकर-द्वितीय, गणपती नाईक-तृतिय, महिला गटात प्रतीक्षा कुरबर-प्रथम, प्रांजल धुडूम-द्वितीय, दक्षता पाटील-तृतिय क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते बंडू कुरबर, कल्लाप्पा गुरव, प्रभाकर बेनके, नागेश सायनेकर, नारायण कोपरडे, जितेंद्र हन्नीकेरी, गणेश सालगुडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article