महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठमोळी अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटात

06:09 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केतकी नारायणची मोठी झेप

Advertisement

अभिनेत्री केतकी नारायण ही हिंदी, मल्याळी, तमिळ, कन्नड यासह अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रे•ाr यांच्यावर आधारित ‘यात्रा 23़ या चित्रपटात केतकी ही वाय.एस. रेड्डी यांची पत्नी भारती यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

केतकीने 2016 साली यूथ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले होते. गर्ल्स या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. मल्याळी मैत्रिणींच्या सांगण्यावरून तिने ‘वीरम’ या मल्याळी चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती आणि तेथूनच तिचा दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. वीरम या चित्रपटातील कामांमुळे अन्य चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागल्याचे ती सांगते. दिवाजीमूला ग्रँड प्रिक्स, अंडरवर्ल्ड आणि फादर चित्ती उम्मा कार्तिक या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तिची मुख्य भूमिका असलेला अवियल हा मल्याळी चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे.

मराठी असूनही मराठी चित्रपटांसाठी फारच कमी विचारणा होते. मराठी चित्रपटांमध्ये आशयघन भूमिका करायच्या आहेत असे तिचे सांगणे आहे. 83 या चित्रपटात तसेच आर्या 3 या वेबसीरिजमध्ये तिने छोटी भूमिका साकारली आहे. लाखों मे एक आणि हाय टाइम या वेबसीरिजमध्ये तिने साकारली भूमिका लक्षवेधी ठरली. कालापानी या सीरिजमधील तिचे पात्र चर्चेत आहे. अथांग या मराठी वेबसीरिजमध्ये ती दिसून आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article