शिनोळी येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करावा
विजय देवणे यांचं एकीकरण समितीला आवाहन
कोल्हापूर
सध्या कर्नाकट राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरु आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे महामेळाव्याची परवानगी ९ डिसेंबर रोजी मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावात महामेळाव्याला परवानगी दिली नाहीच, तर १४४ कलमही लागू केले. याअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी विशेष करून बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घातली. तर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, मालोजीराव अष्टेकर यांना विनंती करण्यात आली आहे, की बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही तरीही कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर शिनोळी येथे शिनोळी येथे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित करावा. यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना विशेष प्रयत्न करेल. या महामेळाव्यात कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला जाईल. त्याबरोबर महाराष्ट्र सरकार बेळगाव सीमाव्याप्त भागासाठी काय करावे याचेही काही ठराव मांडता येतील, असे आवाहान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केले.