For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्रजीपेक्षाही मराठी शाळा गुणवत्तापूर्ण

06:35 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्रजीपेक्षाही मराठी शाळा गुणवत्तापूर्ण
Advertisement

. ए. युवा समितीचे आदर्श शाळा पुरस्कार वितरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर मराठी प्राथमिक शाळांशिवाय पर्याय नाही. आज अनेक मार्गांनी मराठी शाळा संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक स्तर वाढल्याने शहरातील मुले इंग्रजीसह सीबीएसई व आयसीएसई शाळांकडे वळत आहेत. परंतु, इंग्रजीचा न्यूनगंड मनातून काढून टाकल्यास इंग्रजी शाळेपेक्षाही मराठी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

Advertisement

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी मराठी भाषा गौरव दिन, भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. मराठा मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये आनंद मेणसे यांनी ‘मराठी भाषेचा विकास-माझी जबाबदारी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, एकीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना दुसरीकडे मराठी भाषेची गळचेपी प्रशासनाकडून सुरू आहे. मराठीसह इतर फलकांना लक्ष्य करून मराठी पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसह आदर्श शाळा मुख्याध्यापकांना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्य केलेल्या स्वयंसेवकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

व्यासपीठावर अॅड. नागेश सातेरी, बी. ओ. येतोजी, आप्पासाहेब गुरव, नगरसेवक रवी साळुंखे, आबासाहेब दळवी, रमाकांत कोंडुसकर, महादेव चौगुले, अॅड. अमर येळ्ळूरकर, किरण गावडे, अॅड. सुधीर चव्हाण, साधना बेळेकर, सरिता पाटील, नेताजी जाधव, अमेय पाटील, आर. एम. चौगुले, मदन बामणे उपस्थित होते.

मराठी शाळांची पटसंख्या खालावली

बेळगावमध्ये एक काळ असा होता, जेव्हा केवळ मराठा समाजच नाही तर दलित, ब्राह्मण, लिंगायत, जैन, भोई, मुस्लीम हे समाजही मराठी माध्यमातूनच शिक्षण घेत होते. परंतु, जेव्हापासून शाळांमध्ये धार्मिक वातावरण वाढू लागले. तेव्हा हळूहळू इतर समाज इंग्रजी, कानडी शाळांकडे वळले. आज शहरातील अनेक शाळा हातावर मोजण्याइतक्या पटसंख्येवर चालविल्या जात असल्याने या शाळा कशा वाचतील, हे पाहणे प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी असल्याचे मेणसे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.