For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुद्रेमनीत आज रंगणार मराठी साहित्य संमेलन

06:45 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुद्रेमनीत आज रंगणार मराठी साहित्य संमेलन
Advertisement

18 वे संमेलन : विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती : तीन सत्रात आयोजन

Advertisement

वार्ताहर/ कुद्रेमनी

कुद्रेमनी येथे यंदाचे 18 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 21 रोजी बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने कै. परशराम मिनाजी गुरव साहित्यनगरीत मराठी शाळेच्या पटांगणावर होणार आहे.

Advertisement

सकाळी 9 वाजता विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी सोहळा निघणार आहे. मंदिरातील श्री विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजन, पालखी पूजन, ग्रंथ पूजन, वेशीतील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन, प्रवेशद्वाराचे उद्घाटन, कै. परशराम मि. गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन, ग्रंथ दालनाचे उद्घाटन, कै. परशराम मि. गुरव स्मारक पूजन, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन, जिजाऊ प्रतिमा पूजन, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, म. ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन, शिव प्रतिमा पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, राजर्षी शाहू प्रतिमा पूजन, स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सभा मंडपातील पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार व दत्ता पाटील (शिनोळी) यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर बेळगाव जिल्हा पंचायतीच्या माजी सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सौंदर्य पेंट्सचे मालक आर. आय. पाटील व पत्नी सरस्वती पाटील दांपत्य 18 वर्षे या संमेलनाचे उद्घाटन करीत आहेत, हे विशेष होय.

संघाचे कार्यकर्ते बाळाराम धामणेकर यांच्या प्रास्ताविकानंतर प्रा. डॉ. मधुरा गुरव (मोटराचे) व्यासपीठावरील मान्यवर व रसिक श्रोत्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

सकाळी पहिले सत्र 10 ते 1 या वेळेत होणार असून कवी, चित्रपट गीतकार श्रीरामपूरचे साहित्यिक संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1 ते 2 या वेळेत कवी संमेलन होणार आहे. कवयित्री डॉ. पल्लवी परूळेकर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवी संमेलनात कवी इंद्रजित घुले (मंगळवेढा), संतोष काळे (सांगली), विश्वास पाटील (राधानगरी), अमृत पाटील (कुद्रेमनी) आदी सहभागी होणार आहेत.

दुपारी 2 ते 2.30 या वेळेत स्नेहभोजन होणार आहे. कंग्राळी (बी.के.) येथील कलमेश्वर सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांचे स्नेहभोजन व्यवस्थेसाठी सहकार्य लाभले आहे. विशेष योगदानाबद्दल दुपारी 2.30 ते 3 या वेळेत सत्कार सोहळा होणार आहे.

संमेलनाचे तिसरे सत्र दुपारी 3 ते 5 या वेळेत सांगोल्याचे प्रबोधनकार संदीप मोहिते व आण्णा चव्हाण यांच्या जुगलबंदी भारूडातून समाजप्रबोधन कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सूत्रसंचालन पी. एल. गुरव करणार आहेत. व्यासपीठावर विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

संमेलननगरीत वैभव डेकोरेटर्स यांनी आकर्षक सभामंडपाची उभारणी केली आहे. ग्रंथदालनासह इतर तयारी पूर्ण झाली आहे.

Advertisement
Tags :

.