कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : कोल्हापुरी मातीतला बहुगुणी रॅपर 'अनिकेत', सशक्त मत मांडणारा कलांवत

01:43 PM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

एका छोट्याशा गावातून आलेला अनिकेत अनेक तरूणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व बनलाय

Advertisement

By : इंद्रजित गडकरी

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूरचा नकाशा ’रॅप साँग’च्या माध्यमातून मांडणारा तसेच राजकारणावर ‘कोल्हापुरी मोये मोये’ नावाचे रॅप सॉग लिहणारा समाजकारणावर बट्ट्याबोळ सारखे रॅप सॉंग तयार करणारा अनिकेत हा कोल्हापुरी मातीतला बहुगुणी रॅपर आहे. अनिकेतने ‘अंत एक प्रारंभ’ आणि ‘ड्रोन मॅन’ या दोन मराठी चित्रपटासाठी गाणीही लिहिली आहेत.

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावातील अनिकेत मच्छिद्र कांबळे कोल्हापुरातील आजच्या कलाविश्वातील एक चमकणारा तारा आहे. संघर्षाशिवाय यश नाही हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो. पण या वाक्याचा अर्थ कृतीतून सिध्द करणाऱ्या अनिकेतने, लहानपणापासून आर्थिक अडचणींना सामोरे जात जिद्दीने आणि मेहनतेने शैक्षिणिक, सामाजिक व कलाक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. एका छोट्याशा गावातून आलेला अनिकेत आज अनेक तरूणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व बनला आहे.

कलाक्षेत्रात ठसा

अनिकेत कांबळे हा राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर रॅपसारख्या आधुनिक माध्यमातून सशक्त मत मांडणारा एक कलांवत आहे. ‘अनिवर्स’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलद्वारे तो तरूणांशी संवाद साधतो. त्याने कोल्हापुरी मॅप साँग तसेच बट्टयाबोळ, ’कोल्हापुरी मोये मोये’ यांसारख्या रॅप सॉगद्वारे कोल्हापूरच्या राजकारणावर प्रहार केला आहे. आगामी काळातही तो अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर रॅप सादर करण्याच्या तयारीत असून त्याद्वारे तरुणांना सजग करण्याचा कार्य करत आहे. त्यांने रशियन भाषा शिकत भाषाशास्त्रातही प्राविण्य मिळवले आहे.

संगीताची विशेष आवड असल्यामुळे तो व्हाईस आर्टिस्ट म्हणून तांडव स्टुडिओमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर अनिकेतने विविध कार्यक्रमांसाठी आपला आवाज देखील दिला आहे. त्याने शिवाजी विद्यापीठातील अविष्कार स्पर्धेमध्ये एका अॅपल्केशनसाठी आवाज दिला होता. त्या आवाजाला आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. अनिकेत कविताही उत्तम प्रकारे लिहतो. त्याने आजतागायत 550 कविता,36 मराठी, हिंदी भाषेतील गाणी लिहली आहेत.

शैक्षणिक प्रवास

अनिकेत यांनी आपले प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण केले.राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून बी.. पदवी घेतल्यानंतर इंग्रजी विषयात एम. . पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्र स्तरावरील शिक्षक पात्रता परीक्षा सेट तर राष्ट्रीय स्तराची नेट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या. सध्या ते पीएच.डी.च्या अभ्यासात व्यस्त असून विद्यापीठातील नॅनो सायन्स विभागात तासिका तत्त्वावर अध्यापन करत आहेत.

कुटुंबाचा आधारवाड

2023 मध्ये अनिकेतच्या वडिलांचे निधन झाले. घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आई, भाऊ आणि आजी यांना सांभाळत तो सध्या नोकरी, शिक्षण करत आहे. अनिकेत कांबळे याचा प्रवास म्हणजे चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि सामाजिक भानाची मुर्तिमंत कहाणी आहे. अडचणी संधीमध्ये कशा ऊपांतरित करायच्या, हे त्याच्या जीवनातून शिकण्यासारखे आहे.

सायकलवरून दिल्लीपर्यंतचा प्रवास

स्वत:ला सिध्द करण्याच्या आणि समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण करण्याच्या हेतूने अनिकेतने कोल्हापूर ते दिल्ली असा 3000 किलोमिटरचा सायकल प्रवास केला. हा प्रवास केवळ भौगलिक नव्हता, तर मानसिक आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा होती.

परदेशी शिक्षण घेण्याचा मानस

"भविष्यात सामाजिक विषयावर रॅप तयार कऊन तरुणांमध्ये जागृतीचा माझा प्रयत्न असणार आहे. तसेच रॅप सोबतच पीएच.डी. पूर्ण कऊन परदेशात शिक्षण घेण्याचा मानस आहे. तरुणांनीही परिस्थिती समोर हार न मानता जिद्दीने आपल्या क्षेत्रात पुढे आले पाहिजे."

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacultural kolhapurmarathi rapperrap songs
Next Article