मराठी राजभाषा समितीचा आज पणजीत प्रखंड मेळावा
प्रतिनिधी/ पणजी
मराठी भाषेच्या संरक्षणासाठी मराठी राजभाषा समितीने राज्यभरात मेळाव्यातून लढा सुरू केला असून, या लढ्याला उदंड प्रतिसाद मिळत असून, मराठी राजभाषेच्या लढ्याने मोठा वेग घेतला आहे. आता हा लढा राजधानीपर्यंत पोहचला असून, मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे रविवार दि. 29 जून रोजी पाटो येथील संस्कृती भवनच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून चळवळीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, मराठी राजभाषा निर्धार समिती, गोवाचे निमंत्रक प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्यासह पणजी प्रखंडचे अध्यक्ष अशोक मोगू नाईक व समन्वयक मिलिंद वामन कारखानीस उपस्थित राहणार आहेत. मेळावा सुरू होण्यापूर्वी पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरात गाऱ्हाणे घालण्यात येणार आहेत. प्रा. वेलिंगकर व गो. रा. ढवळीकर हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.