For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी निर्धार समितीचा आज शिरोड्यात मेळावा

12:17 PM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
मराठी निर्धार समितीचा आज शिरोड्यात मेळावा
Advertisement

पणजी : मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे जनजागरण अभियान अंतर्गत सुरू झालेल्या प्रखंड मेळावा आयोजनातील एप्रिल महिन्यातील तिसरा मेळावा आज मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी शिरोडा येथे होणार आहे. मेळावा शिरोडा येथील रवळनाथ सभागृहात सायंकाळी 5 वा. होणार आहे. निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर व ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. मेळाव्यात शिरोडा प्रखंड समितीची निवड करण्यात येईल. बोरी, शिरोडा, बेतोडा-निरंकाल, पंचवाडी आदी पंचायतक्षेत्रातील सर्व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे संयोजक गोविंद गणेश देव यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.