सावंतवाडीत उद्या कोमसापचे मराठी साहित्य संमेलन
साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार संमेलन ; दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलन उद्या शनिवारी 22 मार्चला सावंतवाडी येथे होत आहे. सावंतवाडी येथील बॅ नाथ पै. सभागृहात सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्हाभरातून साहित्यिक. तसेच लेखक, कवी ,वाचक ,साहित्यप्रेमी नागरिक या संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के पत्रकार परिषदेत दिली . यावेळी तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत ,जिल्हा खजिनदार भरत गावडे ,सचिव प्रतिभा चव्हाण ,सहसचिव राजू तावडे ,उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर,ॲड नकुल पार्सेकर, दीपक पटेकर ,प्रा. रुपेश पाटील, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, सौ नीलम पालव,दीपक देसाई ,पत्रकार अमोल टेंबकर आधी उपस्थित होते.
या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, मुलाखत ,परिसंवाद ,कवी संमेलन असे विविध साहित्यिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या संमेलनात ग्रंथ प्रदर्शन पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनासाठी विशेष बाब म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे . स्वागत अध्यक्ष आमदार दीपक केसरकर तर उद्घाटक पालकमंत्री नितेश राणे, संमेलन अध्यक्ष गंगाराम गवाणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सौ नमिता कीर , विश्वस्त रमेश कीर , कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ , जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, प्रांताधिकारी हेमंत निकम ,मुख्याधिकारी पारितोष कंकाळ आदी उपस्थित राहणार आहेत . सकाळी ९. ३० वाजता ग्रंथदिंडीचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.