For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्तदान करून साजरा केला मराठी भाषा गौरव दिन

10:14 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
रक्तदान करून साजरा केला मराठी भाषा गौरव दिन
Advertisement

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्राचा उपक्रम : निरोगी व्यक्तीने रक्तदान करणे आवश्यक : कर्करोग तज्ञ डॉ. कुमार विंचुरकर

Advertisement

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. कुमार विंचुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. डॉ. कुमार विंचुरकर म्हणाले, एका रक्तदानामुळे आपण अनेकांचे जीव वाचवू शकतो. रक्तदानाची खरी गरज आम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये जाणवत असते. वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक जीव गमवावे लागतात. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे. यामुळे इतरांचा जीव तर वाचेलच, त्याचबरोबर रक्तदात्यालाही नवीन ऊर्जा मिळेल, असे विचार त्यांनी मांडले.

केएलई ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. श्रीकांत विरगी यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले. रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर करून रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. लोकमान्य परिवार केवळ बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या सेवेसाठीही कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. केएलई ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे काम केले. प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, क्षेत्रीय व्यवस्थापक एम. एन. कुलकर्णी, डॉ. विठ्ठल माने, सीएफओ निवृत्त कर्नल दीपक गुरव, सीईओ अभिजित दीक्षित, आयटी विभागप्रमुख सुनील मुतगेकर, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरी यांच्यासह लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.