मळगाव वाचन मंदिरात उद्या मराठी भाषा गौरव दिन
04:07 PM Feb 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव मध्ये शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.हा कार्यक्रम संध्याकाळी ३:३०वाजता आयोजित केला आहे ,या कार्यक्रमात काही वाचक, बालवाचक आपले सादरीकरण करणार आहेत.प्रमुख अतिथी मा. सौ.स्मिता नाईक(माजी मुख्याध्यापिका ,लेखिका)यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे उपस्थित राहण्याचे आवाहन वाचन मंदिराकडून करण्यात आले आहे .
Advertisement
Advertisement