For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलगावात ''मराठी भाषा गौरव दिन'' उत्साहात

04:49 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोलगावात   मराठी भाषा गौरव दिन   उत्साहात
Advertisement

कोकण मराठी साहित्य परिषद आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुलचे आयोजन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल आयोजित ''मराठी भाषा गौरव दिन'' कार्यक्रम मोठ्या उत्साहात कोलगाव येथे संपन्न झाला. या निमित्ताने ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुकल्यांच्या वेशभूषा धारण करत महाराष्ट्रातील संत परंपरेचा जागर केला.कोमसापचे ज्येष्ठ सदस्य प्रा. सुभाष गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला. स्टेपिंग स्टोन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करण्यात आलं. यावेळी सहभागी चिमुकल्यांनी माझी आई, माझी मराठी, मराठी भाषा चिरायु होवो !, मराठीचा अभिमान, महाराष्ट्राची शान, जपूया मराठी भाषा, वाढवूया तिची अभिमानाची आशा आदी घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडला. ग्रंथदिंडीतून महाराष्ट्रातील संत व वारकरी परंपरेचा जागर करण्यात आला. यामध्ये चिमुकल्यांनी संत तुकाराम, संत एकनाथ, स्वामी विवेकानंद, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत सोहिरोबानाथ आंबिये आदींसह वारकरी वेश धारण केला होता. या ग्रंथदिंडीचे हे खास आकर्षण ठरले. यानंतर ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर यांच्या हस्ते बाल साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के , ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर , कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर,जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत , मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, सहसचिव विनायक गांवस, स्टेपिंग स्टोन समन्वयक सुषमा पालव, डॉ. भक्ती तावडे-गांवस, मराठी विभाग प्रमुख चैताली वेर्लेकर, मराठी शिक्षक मिनानाथ वारंग आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.