For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

10:06 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठा भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा आपटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. हुंदरे होते. बी.एड् विद्यार्थ्यांच्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रा. वर्षा महाजन यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी कवी कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, वसंत बापट, गोविंद केळकर, कृ. ब. निकुंब यांच्या कवितांचे गायन केले. विद्यार्थिनी दीपिका गडकरी व प्रियांका माळवे यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. प्राचार्य हुंदरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डी.एड् प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. मंगल कुकडोळकर यांनी सूत्रसंचालन तर रुपाली देसाई हिने आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.