दाणोली वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा दिन साजरा
विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
कवि साहित्यिक वि. वा . शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माय मराठीला केंद्र शासनाकडून अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. हा आपल्या मराठी भाषेचा गौरव दिवस आहे. असे प्रतिपादन दाणोली येथील साटम महाराज ग्रंथालयाचे अध्यक्ष भरत सडक गावडे यांनी केले. सुरुवातीला डॉ. श्री विठ्ठल अनंत सावंत आणि चिंतामणी मुंडले यांच्याहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे सदस्य सखाराम तिळवे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. सुरुवातीला डॉ. विठ्ठल अनंत सावंत आणि चिंतामणी मुंडले यांच्याहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. दीपा सुकी, कर्मचारी दिलीप सुकी, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका विद्यार्थी, दाणोली हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पवन केसरकर यांनी आभार मानले.