माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरचा विनोद मराठी कॉमेडीयनला पडला महाग
१० ते १२ लोकांच्या गटाने केला हल्ला
सोलापूर
मराठमोळ्या कॉमेडीयन प्रणित मोरेला माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केलेला जोक महागात पडला. प्रणित मोरेचा सोलापूरमध्ये २४ के क्राफ्ट ब्रुझ येथे शो होता. हा शो ५.४५ संपला. यावेळी प्रणित त्याच्या फॅन्ससोबत सेल्फी काढत होता. दरम्यान दहा ते बारा जणांचा गट आला, त्यांना सेल्फी काढायचा नव्हता तर या गटाने प्रणितला मारहाण केली.
प्रणितने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर प्रणितच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. दोन फेब्रुवारीला प्रणितच्या सोलापूर येथील शो नंतर जमावाने प्रणितला मारहाण केली. आणि अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा अशी धमकी ही दिली. पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम होतील असेही सांगितले. या गटाचा तन्वीर शेख हा प्रमुख होता.
वीर पहारिया याने बॉलीवूडमध्ये स्काय फोर्सच्या माध्यमातून नुकतेच पदार्पण केले आहे. वीर पहारिया हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा मुलगा आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र सुशीलकुमार शिंदे यांचा वीर हा नातू आहे.
ही घटना घडल्यानंतर वीर पहारियाने माझ्या या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. मी प्रणित आणि त्यांच्या फॅन्सची माफी मागतो. अशी पोस्ट वीर पहारिया याने त्याच्या सोशल मिडीयावरून शेअर केली आहे.