प्राजक्ता माळीला मराठी सेलिब्रेटींचा जाहीर पाठींबा
सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रेटींनी केला घटनेचा निषेध
मुंबई
प्राजक्ता माळीचे गेल्या काही दिवसात सोशल मिडीया चांगलेच चर्चेत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या संदर्भात केलेल्या विधाननंतर वादंग निर्माण झाला. आमदार धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ताला लोकांच्या नाराजीला, ट्रोलिंग सामने जावे लागेल. या संदर्भात अभिनेत्रीने पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील तिला झालेल्या त्रासाचा खुलासा केला. आमदार सुरेश धस, करुणा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. त्या वक्तव्याबद्दल प्राजक्ता माळीची आमदार धस यांनी जाहीर माफी मागितली. यानंतर या प्रकरणावर पडदा पाडला.
पण मराठी सेलिब्रेटींनी मात्र या प्रकरणाचा जाहीर निषेध सोशल मिडीयावर व्यक्त केला. अनेक मराठी सेलिब्रेटींनी प्राजक्ता माळीला जाहीर पाठींबा दिला. सोशल मिडीयावर ऐश्वर्या नारकर, सुशांत शेलार, कुशल बद्रिके, अश्विनी संभेराव, अश्विनी महांगडे, मेघा धाडे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रेटी प्राजक्ताच्या बाजूने राहीले. या सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मिडीया हॅंडेलवरून या घडलेल्या घटनेचा जाहीर विरोध केला. यांसारखे सेलिब्रेटी या प्रकरणावर आपलं मत रोकठोकपणे सोशल मिडीयावर मांडल्यामुळे या प्रकरणावर योग्य पद्धतीने पडदा पडेल.