Cannes Film Festival 2026 | कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा साज! अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक लूकने वेधले जगाचे लक्ष
Cannes 2026 मध्ये मराठी संस्कृतीची झलक
Cannes Film Festival - सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा फेस्टिव्हल म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल.... सध्या हाच कान्स फिल्म फेस्टीव्हल जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. नुकताच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 ( Cannes Film Festival 2026) ला सुरुवात झाली आहे..2 दिवसापुर्वी आलिया भट्टचा कान्सच्या लुकने सर्वांना वेड लावले होते... आलियाचा कान्सचा लुक सोशल सोशल मिडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता, काहींनी आलियाला कान्सनमध्ये पॅपराझीनी इग्नोर केलं म्हणुन ट्रोल देखील केलं होतं... पण आता कान्स फिल्म फेस्टिव्हलची रंगत आपल्या पारंपरिक मराठमोळ्या वेशाने वाढवली ती म्हणजे या मराठमोळ्या प्रसिध्द कलाकांरानी...
यंदा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. मराठी सिनेसृष्टीचे लाडके अशोकमामा यांनी निवेदिता सराफ यांचा हात हातात धरत दिमाखात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री होताच, उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. त्यासाठी कारण ठरला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलेला मराठमोळा साज. रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मराठी संस्कृती जपत पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. अशोक-निवेदिता सराफ यांनी मराठमोळ्या लूकनं कान्समध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या साध्या पण आकर्षक लूकची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे
याचबरोबर प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर या अभिनेत्रींनीही पारंपरिक मराठी पेहरावात फ्रान्समध्ये मराठी संस्कृतीची झलक दाखवत चाहत्यांची मनं जिंकली. सध्या या मराठमोळी कलाकांराचा लुकची सोशल मिडीया चांगलीच चर्चा सुरू आहे....