मराठा युवक संघाची शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध 7 वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धा मंगळवार दि.27 जानेवारीला होईल. जिह्यातील सर्व शरिरसौष्ठवपटूंसाठी स्पर्धा खुली असणार आहे. तसेच राज्यस्तरीय कर्नाटक मिस्टर हरक्मर्युलस राज्यस्तरीय टॉप टेन ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर एम, पंच अजित सिध्दण्णावर यांच्या सर्व सहकारी पंचांच्या हस्ते ही निवड करण्यात येणार आहे. सभेला माऊती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी,दिनकर घोरपडे, लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, शिवाजी हंगीरगेकर, विनोद हंगिरगेकर, दिगंबर पवार, मनोहर कालकुंद्रीकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, आप्पासाहेब गुरव, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, मोहन चौगुले व इतर सभासद उपस्थित होते.