For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा आरक्षणासाठी जेवळीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढून समाजबांधवांचा एल्गार

06:02 PM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठा आरक्षणासाठी जेवळीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन  पाण्याच्या टाकीवर चढून समाजबांधवांचा एल्गार
Advertisement

उमरगा (प्रतिनिधी : महादेव पाटील) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोहारा तालुक्यातील जेवळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

Advertisement

मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर रोजी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण स्थगित केले असून, सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

याच पार्श्वभूमीवर जेवळी येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी “एक मराठा, लाख मराठा” आणि “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणा देण्यात आल्या.

Advertisement

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारीही पाण्याच्या टाकीवर चढले. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते.

यानंतर मंडळ अधिकारी नेमचंद शिंदे आणि तलाठी दीपक रेड्डी यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार आणि बीट अंमलदार कान्तू राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.