For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील कोल्हापुरात दाखल! ताराराणी चौकात जंगी स्वागत; आज शाहू महाराजांची घेणार भेट

10:15 AM Jun 15, 2026 IST | NEETA POTDAR
manoj jarange patil   मनोज जरांगे पाटील कोल्हापुरात दाखल  ताराराणी चौकात जंगी स्वागत  आज शाहू महाराजांची घेणार भेट
Advertisement

Advertisement

कोल्हापुर -मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरात आले. त्यांचे कावळा नाका, ताराराणी चौकात येथे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सोमवारी, १५ रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कळंबा रोड येथील सिद्धी फार्म हाऊस येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली.

Advertisement

रविवारी आगमन झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी रणरागिनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी प्रविण पाटील, आश्विन कुमार वागळे, तानाजी हातकर, प्रशांत सासणे, ओमकार नलवडे, अभि पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आपटेनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. त्यानंतर ते अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेणार आहेत. तेथून १० वाजता ते सिद्धार्थनगर येथील राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देणार असून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता ते न्यू पॅलेस येथे खासदार शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेणार आहेत. तेथेच ते मराठा आरक्षणाशी निगडीत प्रमुख कार्यकर्त्याची बैठक घेणार आहेत. त्यानंतर पॅलेस म्युझियम पाहून दुपारनंतर ते पुढे जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.

Advertisement
Tags :

.