For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याने सरुडमध्ये साखर वाटुन आनंदोत्सव

02:48 PM Jan 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याने सरुडमध्ये साखर वाटुन आनंदोत्सव
Maratha reservation celebration
Advertisement

सरुड : वार्ताहर

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसह समाजाच्या अन्य मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर सरुड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत चौकात साखर वाटप करून फटाक्याची आतषबाजी केली .

Advertisement

शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश काढल्याची बातमी समजताच सरुड गावातील मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामपंचायत चौकत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घोषणाबाजी करत एकत्र आले . यावेळी कार्यकर्त्यांनी गावातुन मोटारसायकल रॅली काढून गावातील चोका चौकात फटाक्यांची आतषबाजी करत साखरवाटप केली . मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेल्या मनोज जरांगे - पाटील यांचे सरूड परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आभार मानण्यात आले .

याप्रसंगी सरपंच भगवान नांगरे , भाई भारत पाटील , राजाराम मगदूम , मनिष तडवळेकर , शामराव सोमोशी - पाटील , सचिन पाटील , ग्रा . प . सदस्य रामदास व्हावळे , निलेश भस्मे , अशोक पाडळकर , बळवंत सोमोशी - पाटील , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबासो सोमोशी - पाटील , बाळासो रोडे - पाटील , बाळासो पाटील - कांदेकर , जयदिप पाटील , प्रविण तडवळेकर , जयसिंग थोरात , अनंत मराठे , आनंदराव पाटील , रणजितसिंह थोरात , अरूण थोरात , आण्णा कुराडे , गणेश पाटील , एस . के . पाटील आदिसह मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Tags :

.