ही मराठा समाजाची फसवणूक...! सगेसोयरे संदर्भात कायदा करा; अन्यथा आंदोलन तीव्र करणार
महाराष्ट्र विधीमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 आरक्षण विधेयक मंजूर झाले. पण ही मराठा समाजाची फसवणूक असल्याचं सांगून निवडणूका डोळ्यावर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाल बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारने सगेसोयरेची लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकार आज महाराष्ट्र भरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी एकच जल्लोश केला. विधीमंडळात आरक्षणाची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असल्याचं म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मी दिलेला शब्द पुर्ण केला असल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.
मराठा आरक्षणाच्या या विधेयकाच्या मंजूरीनंतर आरक्षमासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे. आपल्या उपोषणस्थळावरून माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "निवडणूक आणि मराठा समाजाची मते डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे.... मराठा समाज तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.... आम्ही केलेल्या आमच्या मूळ मागण्यांचाच फायदा होणार आहे. सगे-सोयरे यावर कायदा करा ....हे आरक्षण कधीच टिकणार नाही. सरकार खोटं बोलत आहे की आरक्षण मिळाले आहे." अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
'सगे सोयरे' संदर्भातील कायदा लागू करण्याची आपली मागणी मनोज जरांगे पाटील यांनी उचलून धरली आहे. तसेच आपले आरक्षणाचे लक्ष साध्य करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "सागे सोयरे' लागू करण्याची माझी मागणी आहे....आंदोलनाची पुढची दिशा लवकरच जाहीर केली जाईल." असेही मनोज जरांगे- पाटील यांनी म्हटले आहे.