Solapur protest | सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा भाजप विरोधात मुंडण आंदोलन
सोलापूरमध्ये सामाजिक न्यायाचा आग्रह
सोलापूर -ज्या मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य साठी स्वतःच रक्त सांडल, अशा समाजावर भाजपच्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजावर केलेल्या राजकीय अन्याय विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी रक्ताने पत्र लिहून छत्रपती संभाजी महाराज चौकात मुंडण आंदोलन केले.
मराठ्यांना रक्तांनी पत्र लिहण्यासाठी आणि मुंडण आंदोलन करण्याची वेळ या लोकांनी आणली असून मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्याय विरोधातमराठा क्रांती मोर्चा राज्यसमन्वयक राम जाधव यांनी यल्गार पुकारला आहे. जो पर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तेव्हा पर्यंत हा लढा चालू राहील, असे जाधव यांनी सांगितले.
महानगरपालिकेत सन १९९३ नंतर ३२ वर्षापासून मराठा समाजाला महापौर पदापासून वंचित ठेवले होते. यंदा ३ दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजपला संधी असताना भाजपच्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिले नाही. १९९३ नंतर सोलापूर महानगरपालिकेत ३ वेळा पद्मसाली समाजाला, २ वेळा मुस्लिम समाजाला, २ वेळा लिंगायत समाजाला, २ वेळा लमाण समाजाला, तर एकदा ब्राह्मण, कैकाडी, धनगर समाजाला विविध पक्षांतून न्याय देण्यात आला आहे. मराठा समाज गेली ३२ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होता.
जिल्हा परिषद ६८ पैकी ५५ उमेदवार निवडून आण्याचा स्वप्न भाजप पक्षाने पाहील होते. परंतु, सोलापूर मनपात महापौरपदाच्या निवडीत मराठा समाजाला डावल्यामुळे आणि शहरातील भाजपच्या काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिला नसल्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपच्या विरोधात ३० जण निवडून आले आहेत. हे त्या मराठा द्वेषींना हे उत्तर आहे. हा राजकीय अन्याय समाज कधीच विसरणार नाही. त्या विरोधात आवाज उठवत राहणार असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.