For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा केआर शेट्टी,आप्पा, कृष्णा संघ विजयी

09:56 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मराठा केआर शेट्टी आप्पा  कृष्णा संघ विजयी
Advertisement

बेळगाव : मराठा स्पोर्ट्स बेळगाव आयोजित महांतेश कवटगीमठ निमत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मराठा स्पोर्ट्स केआर शेट्टी, आप्पा स्पोर्ट्स, कृष्णा स्पोर्ट्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून  उपांत्यपूर्व फेरी गाठली. रोहित पाटील, शुभम शेळके, प्रवीण गावडे, राजसिंग, विनायक शाहू यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स केआर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 104 धावा केल्या. त्यात रोहित पाटीलने नाबाद 40, संतोष शेळकेने 27 तर गुंडू बाणीने 16 धावा केल्या. कांतारा बॉईजतर्फे दर्शनने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कांताराम संघाने 8 षटकात 7 गडी बाद 75 धावा केल्या. त्यात संतोष बडगेरने 24, विनोदने 16 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्स केआर शेट्टीतर्फे रोहित पाटील व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात आप्पा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 129 धावा केल्या. त्यात शुभम शेळकेने 32, सुरेश इंदुलकरने 23 तर तांबेने 18 धावा केल्या. आयोध्यातर्फे ऋतिकने 3 तर तुषारने 2 गडी बाद केले.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयोध्या कडोलीने 8 षटकात 8 गडी बाद 42 धावा केल्या. आप्पा स्पोर्ट्सतर्फे विकी कांबळेने 3 तर सोमशिंगने 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात जैन संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 79 धावा केल्या. त्याला उत्तर देताना कृष्णा स्पोर्ट्सने 6.5 षटकात 1 गडी बाद 80 धावा करून सामना 9 गड्यानी जिंकला. चौथ्या सामन्यात आप्पा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी 86 धावा केल्या. दत्ता सावंतने 26, शुभम शेळकेने 22 धावा केल्या. डिंगडाँगतर्फे नागेशने 3, विशाल व मनोज ताशिलदार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना डिंगडाँग संघाने 8 षटकात 6 गडी बाद 71 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. विशालने 19, मनोज ताशिलदारने 16 धावा केल्या. आप्पा स्पोर्ट्सतर्फे राजसिंगने 3 गडी बाद केले. पाचव्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स केआर शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 76 धावा केल्या. विनायक साहूने 36, मदन बेळगावकरने 20 धावा केल्या. दुर्गा स्पोर्ट्सतर्फे सुरेश भोसलेने 3 तर सुरेश कांबळेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दुर्गा स्पोर्ट्सने 8 षटकात 5 गडी बाद 64 धावा केल्या. प्रशांतने 16 तर सिद्धुने 15 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे किरण तारळेकरने 3 गडी बाद केले. मान्यवरांच्या हस्ते विविध सामन्यातील सामनावीरांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.