For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा इन्फंट्रीतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम

03:04 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
मराठा इन्फंट्रीतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम
Advertisement

बेळगाव : गांधी जयंतीचे औचित्य साधून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अधिकारी, जेसीओ तसेच कुटुंब कल्याण समुदायातील शंभरहून अधिक महिलांसह 550 जणांनी अभियानामध्ये सहभाग घेतला होता. याचे नेतृत्व मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केले. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठा लाईट इन्फंट्री येथील 20 हून अधिक मार्गांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केवळ स्वच्छता मोहीम न राबवता नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त मराठा लाईट इन्फंट्रीचा हा उपक्रम दरवर्षी राबविला जात असून त्याला नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.