मराठा समाजाचा उद्या भव्य मेळावा
बेळगाव : मराठा समाजाची एकी करण्यासोबतच राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या जातनिहाय जनगणना जागृतीसाठी रविवार दि. 21 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गुरुवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 22 सप्टेंबरपासून जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेवेळी मराठा समाजाने जात मराठा, उपजात कुणबी व मातृभाषा मराठीचा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले. या जनगणनेविषयी ग्रामीण भागात तितकीशी माहिती नसल्याने अधिकाधिक जागृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, किरण जाधव, जयराज हलगेकर, रणजीत चव्हाण-पाटील, शिवराज पाटील, अंकुश केसरकर, राजू बिर्जे यांच्यासह इतर उपस्थित होते.