महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असंख्य युवक राजकारणात येण्यास सज्ज

06:36 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदी यांचे ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन, अवकाश संशोधनासह अनेक मुद्यांना केला स्पर्श

Advertisement

वृत्तसंस्था / .नवी दिल्ली

Advertisement

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या युवकांनी राजकारणात मोठ्या संख्येने यावे, या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपण केलेल्या आवाहनाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज सहस्रावधी तरुण, जे कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नाहीत, किंवा ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही, ते राजकारणात येण्यास सज्ज आहेत. यामुळे राजकारणाची गुणवत्ता सुधारणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात राष्ट्राला उद्देशून संदेश देताना केले आहे. या कार्यक्रमात त्यांनी देशहिताच्या अनेक मुद्द्यांचा परामर्ष घेतला.

रविवारी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात आले. आकाशवाणीच्या 500 हून अधिक केंद्रांवरून त्याचे एकाचवेळी प्रसारण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का कार्यक्रमात अवकाश संशोधन क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या अनेक युवकांशी संवाद साधला. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने या क्षेत्रात साधलेल्या प्रगतीविषयीही विस्तृत भाष्य केले.

अवकाश संशोधनात स्पृहणीय कार्य

21 व्या शतकात भारताने अवकाश संशोधनात अभिमानास्पद कार्य करून दाखविले आहे. 23 ऑगस्टला साऱ्या देशाने प्रथम अंतराळ दिन साजरा केला. गेल्यावर्षी याच दिवशी भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या अवतीर्ण झाले होते. असे करणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरला होता. भविष्यकाळासाठीही भारताचे अनेक अंतराळ कार्यक्रम निर्धारित आहेत. या क्षेत्रातील आपली प्रगती मोठी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राजकारण आणि युवक

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा एक लाख युवकांना राजकारणात आणण्याची घोषणा आम्ही 15 ऑगस्टच्या भाषणात केली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावरून असे दिसून येते की, असे अनेक युवक आज राजकारणात येण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे. अनेक युवकांनी मला या संबंधी सूचना पाठविल्या असून त्यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केली.

‘हर घर तिरंगा’ अभियान

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षापासून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला यंदाही अद्भूत प्रतिसाद मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी घराघरांवर तिरंगा फडकवून लोकांनी आपली देशभक्ती प्रदर्शित केली. घरे, इमारती, कार्यालये, आपल्या संगणकावरील डेस्कटॉप, मोबाईल आणि वाहनांवरही तिरंगा फडकविला. जम्मू-काश्मीरमध्ये 750 फूट लांबीच्या तिरंग्यासह भव्य मिरविणूक काढण्यात आली. अशी दृष्ये पाहिली की अंगावर रोमांच उभे राहतात. मनाला समाधान वाटते, असे भावोत्कट उद्गार त्यांनी आपल्या संदेशात काढले आहेत.

अरुणाचलातील अभिनव प्रयोग

शिंगे, त्वचा, हाडे इत्यादी मिळविण्यासाठी पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. त्यामुळे अनेक पशू प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे नष्टचर्य थांबविण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील युवकांनी केलेला प्रयोग अभिनव आहे. या युवकांनी अशा प्राण्यांना वाचविण्यासाठी थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रारंभ केला आहे. या प्रयोगातून ते लोकांचे प्रबोधन करीत आहेत. नाबाम बापू आणि लिख नाना यांनी यात पुढाकार घेतला असून या प्रयोगांचे अनुकरण साऱ्या देशात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कचऱ्यातून कला

मध्यप्रदेशातील झाबुआ येथील सफाई कामगारांनी साकारलेले अभियान कौतुकास्पद आहे. त्यांनी कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. झाबुआ येथील उद्यानात कचऱ्यातून त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती पाहण्यासारख्या आहेत. आपल्या देशात कल्पकतेची कमतरता नाही याचा प्रयत्न या अभियानांमधून येत असतो. कचऱ्यातून संपत्ती हे अभियान निश्चितच अनुकरणीय आहे, असेही गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

विश्व संस्कृत दिन

देशाने रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव 19 ऑगस्टला साजरा केला. त्याच दिवशी साऱ्या जगामध्ये ‘विश्व संस्कृत दिन’ साजरा करण्यात आला. आज जगाचे लक्ष्य संस्कृत भाषेकडे वेधले गेले आहे. तसेच अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेवर संशोधन होत आहे. भारताची ही प्राचीन भाषा आज जगात लोकप्रिय होत आहे, हे पाहून समाधान वाटते आणि उत्साह येतो, अशी भलावण त्यांनी केली.

पोषण महिन्याचे महत्व

बालकांना कुपोषणापासून दूर ठेवणे आणि त्यांना सत्वयुक्त आहार पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बालकांच्या भरण-पोषणाकडे आमचे प्रतिदिन लक्ष असतेच, पण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा एक महिन्याचा कालावधी आम्ही ‘पोषण माह’ म्हणून पाळण्याचा संकल्प केला आहे. बालकांचे पोषण हे राष्ट्रीय उत्तरदायित्व असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

स्टार्टअपची प्रशंसा

भारतात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप कंपन्या साकारत आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. पर्यावरणाचे संरक्षण केले नाही, तर जीवसृष्टीची मोठी हानी होऊ शकते, हे आता ध्यानात येत असून हालचाली होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. सरकारही या कामासाठी प्रोत्साहन देत आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

व्यापक प्रसिद्धी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम 22 भारतीय भाषा आणि 29 बोलीभाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. तसेच 11 विदेशी भाषांमध्येही तो ऐकवला जातो. या विदेशी भाषांमध्ये फ्रेंच, चीनी, इंडोनेशियायी, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पुष्तू, फारशी आणि दारी अशा भाषांचा समावेश आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

ड युवकांना राजकारणात मोठे स्वारस्य, कार्यासाठी असंख्य युवक आसुसलेले

ड अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची असामान्य प्रगती, भविष्यकाळ उज्ज्वल

ड ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला यंदाही उत्स्फूर्त आणि राष्ट्रव्यापी प्रतिसाद

ड पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात स्टार्टअप कंपन्यांचे योगदान अतिप्रशंसनीय

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article