For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी नगराध्यक्ष नारायण मयेकरसह अनेकांचा काँग्रेसला पाठिंबा

10:43 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी नगराध्यक्ष नारायण मयेकरसह अनेकांचा काँग्रेसला पाठिंबा
Advertisement

खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष नारायण मयेकरसह जि. पं. माजी सदस्य मुगुटसाब धारवाडी, रमेश पाटील, रमेश नाईक, कृष्णा मन्नोळकर, नारायण सावंत, म्हात्रू धबाले, नारायण मासेकर, सौ. कमल गुरव, शौकत सनदी यासह अनेक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि. 30 रोजी कारवार लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून निवडणुका होईपर्यंत प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष नारायण मयेकर म्हणाले, मी 2002 पासून खानापूर तालुका प्रमुख आहे. आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडी उभी केली असून मोदींच्या हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मोदीनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला नकली असे संबोधून सीमाप्रनासाठी 105 हुतात्मे देणाऱ्या शिवसेनेचा मोदीनी तमाम मराठी भाषिकांचा अपमान केला आहे. गेल्या 30 वर्षात भाजपच्या खासदारानी खानापूरच्या विकासासाठी अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. खानापूरची नेतेमंडळी याबाबत मौन पाळून गप्प आहेत. 70 वर्षाच्या इतिहासात कारवार लोकसभा मतदारसंघात खानापूर तालुक्याला तसेच मराठा समाजाला आणि मराठी भाषिक असणाऱ्या अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने आम्हाला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा देत असून पुढील काळात आम्ही काँग्रेसचा जाहीर प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी नारायण मयेकर यांनी सांगिलते. काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या त्यांच्या भेटीप्रसंगी नारायण मयेकर, नारायण मासेकर, प्रकाश पाटील, कमल गुरव, सौ. शौकत सनदी, यशवंत बिर्जे, म्हात्रु धबाले, राजेश पाटील, कृष्णा मन्नोळकर, विनायक मुतगेकर, रमेश नाईक, विष्णु शास्त्राr, नारायण सावंत, मुगुटसाहब धारवाडी लोंढा आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.