For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनेक नेत्यांची आज न्यायालय वारी?

06:55 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनेक नेत्यांची आज न्यायालय वारी
Advertisement

एफआयआरला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची शक्यता : न्यायालयाकडे सर्वांच्या नजरा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

एफआयआरच्या भोवऱ्यात अडकलेले अनेक राजकीय नेते सोमवारी न्यायालयात हजर होण्याची दाट शक्यता आहे. मुडा प्रकरणात एफआयआर दाखल झालेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या, निवडणूक बाँड प्रकरणी एफआयआर दाखल झालेले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, माजी प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्यासह अनेक नेते सोमवारी एफआयआरला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची शक्मयता आहे.

Advertisement

मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची चौकशी करण्याची राज्यपालांची परवानगी उच्च न्यायालयाने उचलून धरल्यानंतर लोकायुक्तमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कायदेशीर लढाईत उतरले आहेत. पुढील कायदेशीर लढाईबद्दल त्यांनी आपले कायदेशीर सल्लागार ए. एस. पोन्नण्णा यांच्यासह अनेक कायदेतज्ञांशी यापूर्वीच अनेक बैठका घेतल्या आहेत. कायदेतज्ञांच्या सल्ल्यानुसार ते उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा आणि एफआयआरचा आदेश देणाऱ्या लोक न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सोमवारी राज्य उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च न्यायालयाचा निकाल आणि लोक प्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मी कायदेशीर लढाई लढणार आहे. कोणत्याही कारणास्तव मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत. कायदेशीर लढाईचा भाग म्हणून सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, असे सूत्रांकडून समजते.

निर्मला सीमारामनही दाखल करणार याचिका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविऊद्ध निवडणूक बाँड घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून सोमवारी त्या आपल्या वकिलांमार्फत एफआयआर स्थगितीसाठी अर्ज दाखल करतील, अशी शक्मयता आहे. निवडणूक बाँड घोटाळ्याप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, माजी प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी, केंद्रीय भाजप कार्यालयातील कर्मचारी आणि प्रदेश भाजप कार्यालयातील कर्मचारी यांच्याविऊद्धही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

या एफआयआरला स्थगिती मिळावी यासाठी भाजपचे वकील याचिका दाखल करण्याच्या तयारीत असून सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला जाणार असल्याचेही भाजपच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी मोठ्या प्रमाणावर याचिका दाखल झाल्यास सर्व नेत्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता दर्शनच्या जामिनावर आज सुनावणी

राज्यभरात एकीकडे एफआयआरविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यासाठी अनेक नेत्यांची तयारी सुरू असताना चित्रदुर्ग रेणुकास्वामी हत्याप्रकरणातील आरोपी अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदारांच्या जामीन अर्जावर  सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायालयात या सर्वांच्या जामीन अर्जावर सुनावणी जाणार आहे. अभिनेता दर्शनला जामीन मिळणार की नाही हे सोमवारच्या सुनावणीनंतर समजणार आहे. त्यामुळे अभिनेता दर्शनसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अभिनेता दर्शनचा तुऊंगवास संपणार की कायम राहणार हे आजच्या न्यायालयीन सुनावणीनंतर कळणार आहे.

Advertisement
Tags :

.