इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द
कंपनीने केली प्रवाशांची क्षमायाचना
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिगो या प्रसिद्ध प्रवासी विमान कंपनीची 85 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. बुधवारी काही तांत्रिक बिघाडामुळे कंपनीला अनेक विमाने रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आल्याने देशातील अनेक विमानळांवर प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनच्या या गैरसोयीमुळे कंपनीने प्रवाशांची क्षमायाचना केली असून लवकरात लवकर उड्डाणांचा प्रारंभ करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये दिल्लीच्या 38, तर मुंबईच्या 33 विमानांचा समावेश आहे. कंपनीने हा निर्णय घेतल्याने अनेक प्रवाशांवर विमानतळांवरच अडकून पडण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांनी अनेक स्थानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कंपनीने ऐनवेळी विमान रद्द झाल्याची घोषणा केल्याने अनेक प्रवाशांना त्यांची महत्वाची कामेही ऐनवेळी पुढे ढकलावी लागली. अनेक प्रवाशांना यामुळे आर्थिक हानीही सोसावी लागल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोणत्या कारणांमुळे कंपनीने असा निर्णय घेतला, यासंबंधी अद्यापही स्पष्टता नसल्याची स्थिती आहे.
चालकांची कमतरता
तांत्रिक बिघाडामुळे विमाने रद्द केल्याचे वृत्त आधी पसरले होते. तथापि, कंपनीकडे विमानचालकांची कमतरता असल्याचे नंतर स्पष्ट झाले आहे. या कंपनीची विमाने रद्द होण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून होत आहेत. बुधवारी मोठ्या संख्येने विमान उ•ाणे रद्द करण्यात आल्याने अनेक विमानतळांवर प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीच्या विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी काही स्थानी संतप्त प्रवाशांनी घेराव घातल्याचीही वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत.
सोशल मिडियावर गदारोळ
विमानतळांवर आपली कशी कोंडी झाली, या संबंधीची व्हिडीओ चित्रणे अनेक प्रवाशांनी सोशल मिडियावर पोस्ट केल्याने प्रचंड गदारोळ झाल्याचे दिसून आले. विमाने रद्द झाल्याने किमान 10 हजार प्रवाशांवर आपला प्रवास रद्द करण्याची वेळ आली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार विमान उ•ाणे रद्द होण्याची अनेक कारणे आहेत. काही विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले होते. तर तीव्र थंडीमुळे, तसेच धुक्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. काही विमानतळांवर ऐनवेळी विमान उ•ाणांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. तसेच काही स्थानी दूरसंचाराची समस्या निर्माण झाली होती. प्रतिकूल हवामानामुळे अनेक विमाने रद्द करावी लागली, असे स्पष्ट केले गेले. चालकांच्या वेळापत्रकासंबंधीचे नवे नियम आता लागू झाले आहेत. त्यामुळे विमानचालकांच्या वेळापत्रकात परिवर्तन करावे लागले. या कारणामुळे काही विमानांच्या उ•ाणांसाठी विमान चालक उपलब्ध होऊ शकले नाहीत, अशी अनेक कारणे कंपनीने या घटनेसाठी पुढे केली आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.