महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटन बंदीमुळे कित्येक घरे अंधाराखाली, स्थिती पुर्ववत करा

01:50 PM Jan 04, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

विशाळगड वासियांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
कोल्हापूर
विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे, तेथील सामान्य रहिवाशांचे जीवन दयनीय झाले आहे. गडावरील पर्यटन पूर्ववत करा अशी येथील स्थानिक रहिवाशांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Advertisement

"माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला विशाळगडवासीयांनी हे पत्र लिहिलेले आहे. या पत्रात विशाळगडावरील अनेक मंदिरांचा केलेल्या जिर्णोद्धाराचा विषय मांडला आहे. गेले कित्येक पिढ्या हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकोप्याने राहत आहेत. अनेक सण आम्ही एकत्र साजरे करतो. येथील हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्रितपणे अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केलेला आहे. विशाळगडावरील पर्यटन सहा महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. विशाळगडावर येणाऱ्या कोणत्याही दुर्गप्रेमी, शिवप्रेमी, पर्यटकाला किंवा भाविकांना कोणालाही वरती गडावर सोडले जात नाही. ज्या भाविकांमुळे, पर्यटकांच्या येण्यामुळे गडावरील अनेक रोजगार सुरू होते, ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. यामुळे विशाळगडावरील सर्वच नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झालेली आहे. येथील नागरिकांना दैनंदिनी जीवनातील खर्च भागविणेही परवडेना झाले आहे. गेल्या सहामहिन्या विशाळगडवासी केवळ सेवाभावी संस्थांच्या मदतीमुळे जीवन जगू शकत आहेत. अशा संस्थातर्फे जो काही अन्न धान्याचा पुरवठा झाला, त्याच्या जीवावरचं येथील नागरिकांनी ६ महिने काढले आहेत. अन्यथा गडावरील स्थानिक लोकांना मीठ घ्यायला सुद्ध पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे. अतिक्रमणापासून विशाळगडावीर कचरा हे सर्व प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लावले गेले आहेत. विशाळगडावर पूर्णपणे दारू बंदी आहे. पूर्णपणे पशुहत्या बंदी आहे. त्यामुळे आमची प्रशासना एवढी विनंती आहे, की विशाळगडावरील पर्यटन लवकरात लवकर चालू करावे. आणि स्थानिकांना सहकार्य करावे. विशाळगडावर जवळपास १०० ते १५० अतिक्रमण होती. यापैकी सरकारने जवळजवळ ९० अतिक्रमण काढली असून उर्वरित अतिक्रमणांचा प्रश्न हाय कोर्टात आहे. यापैकी जी बेकायदेशीर अतिक्रमण आहेत, ती काढावीत. अतिक्रमणांची कारवाई करताना सुद्ध येथील ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य केले होते. आजही आम्ही संपूर्णपणे सहकार्य करू", अशी प्रतिक्रिया बंडू भोसले, या विशाळगडावरील स्थानिक रहिवासींनी दिली.
तर याप्रसंगी विशाळगडावरील रहिवासी शाईन मुजावर म्हणाल्या, "विशाळगडावरील स्थानिकांवर उपासमारी वेळ आली आहे. रोजच्या जीवनात शिक्षण, वयोवृद्धांच्या औषधाचा खर्चही परवडेना झालाय. तर गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचीही परिस्थिती नाही, अशी वेळ विशाळगडावरील नागरिकांची राहिलेली नाही. विशाळगडवासियांसोबत येथील आजूबाजूच्या १२ वाड्यांचा उदरनिर्वाह विशाळगडावरील पर्यटनावर अवलंबून होता. आमची ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने विशाळगडावरील जनजीवन पुर्ववरत करावी अशी आमची मागणी आहे". अशी प्रतिक्रीया यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article