अनेक शहरांना उल्कांचा धोका
पृथ्वीवरील अनेक महानगरांना आणि शहरांना सध्या उल्कापाताचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने यासंबंधी एक गंभीर इशारा दिला आहे. पृथ्वीच्या अवती-भोवती अंतराळात जवळपास 15 हजार उल्कापिंड भ्रमण करीत आहेत. त्यांना नासाने ’सिटी कीलर’ किंवा ‘नगरसंहारी’ उल्कापिंड असे संबोधले आहे. चिंतेचा मुख्य विषय असा, की समजा, त्यांच्यापैकी काही उल्कापिंड पृथ्वीवरील शहरांवर आदळले, तर त्यांच्यापासून बचाव करणारी कोणतीही यंत्रणा किंवा अंतराळ वाहने बहुतेक शहरांजवळ नाहीत. असा उल्कापात मोठ्या प्रमाणात झाल्यास महानगरांची प्रचंड हानी होऊ शकते .तसेच बऱ्याच प्रमाणात जीवीत हानी होऊ शकते. या उल्कापिंडांपैकी अनेक पिंडाचा व्यास 140 मीटर इतका मोठा आहे.
असा एक उल्कापिंडजरी एखाद्या मोठ्या शहरावर आदळला, तरी ते संपूर्ण शहर किंवा त्याचा मोठा भाग या उल्केच्या राखेत दबला जाऊ शकतो. अपरिमित हानी होऊ शकते. संपूर्ण नगरही नष्ट होणे शक्य आहे. यांपैकी अनेक उल्कापिंड दुर्बिणीच्या टप्प्याबाहेरचे असल्याने त्यांच्या हालचाली न्याहाळणे आणि ते पृथ्वीवर पडण्याच्या आत त्यांचा नाश करणे सध्यातरी अशक्य आहे. ते पृथ्वीवर पडण्याआधीच अवकाशात जाऊन त्यांचा नाश करण्यासाठीचे संशोधन करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही हे प्रयोग बाल्यावस्थेतील आहेत. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्कापिंडांची दिशा परिवतर्तीत करणारे तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला ाात आहे. तथापि, त्यालाही म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी पृथ्वीवरील अनेक गजबजलेली महानगरे धोक्याच्या सावटात आहेत, असे नासाचे म्हणणे आहे. नुकताच ‘वायआर 4’ नावाचा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येत होता. तो पृथ्वीवर आदळणारच होता. तथापि, ऐनवेळी त्याने अपोआप दिशा सोडली आणि पृथ्वी थोडक्यात बचावली आहे.