हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये मानुषी
पुढील वर्षी सुरू होणार चित्रिकरण
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडीचे जग आणखी विस्तृत होत चालले आहे. स्त्राr, भेडिया यासारखे चित्रपट निर्माण करणारे प्रॉडक्शन हाउस आता नवा प्रवास सुरू करणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या पुढील चित्रपटासाठी दोन नवे चेहरे आणले जाणार आहेत. सुपरस्टार रणवीर सिंह आणि मानुषी छिल्लर या चित्रपटात दिसून येणार आहेत. रणवीर काही काळापासून दिनेश विजानसोबत चर्चा करत आहे. रणवीरने मागील आठवड्यात मॅडॉकच्या कार्यालयात हजेरी लावली होती. रणवीर हॉरर कॉमेडी शैलीच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असून लवकरच यासंबंधी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
रणवीर सध्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’चे चित्रिकरण करत आहे. तसेच तो डॉन 3 चित्रपटात काम करणार आहे. धुरंधरचा टीझर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. तर मानुषी ही लवकरच मालिक या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसून येणार आहे. मॅडॉकने यापूर्वी आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘थामा’ची घोषणा केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रश्मिका मंदाना दिसून येणार आहे. तर मॅडॉकच्या ‘शक्ति शालिनी’ चित्रपटात कियारा मुख्य भूमिकेत असणार आहे.