महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्पादन क्षेत्राचा पीएमआय 16 वर्षांच्या उच्चाकांवर

06:26 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्च महिन्यात विक्रमी कामगिरीची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

उत्पादन क्षेत्राच्या पीएमआय (इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) ने मार्च महिन्यात एक नवीन विक्रम केला. या विक्रमाने 16 वर्षांचा उच्चांक गाठला. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात उत्पादन क्षेत्राने जबरदस्त कामगिरी केली. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय फेब्रुवारी महिन्यात 56.9 होता. जो आता 59.1 पर्यंत वाढला आहे. याआधी फेब्रुवारी 2008 मध्ये असा उच्च विक्रम झाला होता.

कारण काय आहे?

उत्पादन पीएमआयच्या उत्कृष्ट कामगिरीमागील कारण नवीन ऑर्डर आणि मजबूत उत्पादन पूर्ण करण्यासाठी कंपन्यांद्वारे नियुक्तींची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 33व्या महिन्यापासून उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. ज्याचे कारण म्हणजे गुंतवणूक, ग्राहक आणि मध्यवर्ती क्षेत्रातील एकूणच तेजी राहिल्याचे सांगितले जात आहे.

स्टॉक वाढीचे लक्ष्य

मार्च महिन्यात कंपन्यांचा मुख्य भर स्टॉक वाढवण्यावर होता, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जेणेकरून ते त्यांची विक्री आणखी वाढवू शकतील.  भारतीय कंपन्यांना विक्री वाढण्याची अपेक्षा होती. पण वाढत्या महागाईच्या चिंतेने त्यांच्या अपेक्षांवर मात केली.

गेल्या पाच महिन्यांत खर्चाचा दबावही सर्वाधिक होता. त्यामुळे कंपन्यांनी प्लास्टिक, यंत्रसामग्री, कापूस, पोलाद, लोखंड इत्यादींसाठी जास्त किंमत दिली.

उत्पादन पीएमआयबाबत, एचएसबीसीचे अर्थशास्त्रज्ञ लॅम म्हणाले की, 2008 पासून मार्च महिन्यात उत्पादन पीएमआय भारतात सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. कंपन्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. क्षमता मर्यादा आणि उच्च मागणीमुळे मार्च महिन्यात इनपुट कॉस्ट इन्फ्लेशनमध्ये वाढ झाली आहे. मे 2023 नंतर दुसऱ्यांदा इन्व्हेंटरी खरेदीमध्येही ते उच्च पातळीवर पोहोचले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article