For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकर, सम्राट राणा यांना रौप्यपदक

06:45 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकर  सम्राट राणा यांना रौप्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था, म्युनिच

Advertisement

येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविताना 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके मिळविली आहेत. चीन पदक तक्त्यात पहिल्या स्थानावर असून त्यांनी 4 सुवर्ण आणि 3 कांस्यपदके मिळविली आहेत.

10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठीच्या लढतीमध्ये चीनच्या विद्यमान विजेत्या क्वियानझुन आणि हू केई यांनी भाकर आणि राणा यांना केवळ 0.3 गुणांच्या फरकाने मागे टाकत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडा प्रकारातील पात्र फेरीमध्ये भारताच्या सुरुची सिंग आणि श्रवण कुमार यांना 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Advertisement

सदर स्पर्धेत 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या दोन्ही जोड्यांना आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. पात्र फेरीमध्ये भारताच्या इलावेनिल वलरिवन आणि अर्जुन बबुता यांनी 630.0 गुण नोंदवित 14 वे स्थान तर आर्या बोर्से आणि शाहू माने या जोडीने 16 वे स्थान मिळविताना 629.6 गुण नोंदविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या वेंग झिफेई आणि सेंग लिहाओ या जोडीने सुवर्ण, नॉर्वेच्या ड्युस्टेड आणि हेग यांनी रौप्य तर चीनच्या जियाऊ आणि सिहान यांनी कांस्यपदक मिळविले.

Advertisement
Tags :

.