For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकरचे मायदेशी जोरदार स्वागत

06:45 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकरचे मायदेशी जोरदार स्वागत
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली 

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारताला 2 कास्य पदके मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनु भाकरचे मायदेशी आगमन झाले.

दिल्लीच्या विमानतळावर बुधवारी सकाळी मनु भाकरचे आगमन झाले. यावेळी विमानतळाच्या कक्षामध्ये तिचे कुटुंबिय सदस्य तसेच असंख्य चाहते  उपस्थित होते. दिल्लीमध्ये सकाळच्या प्रहरी किरकोळ पावसाच्या सरी येत होत्या. तिच्या चाहत्यांनी विमानतळ कक्षाच्या बाहेर स्वागत करताना पुष्पगुच्छ तसेच फुलांचा वर्षाव केला. मनु भाकरचे आई-वडील रामकिशन आणि सुमेधा यांनी मनुच्या कामगिरीचे कौतुक केले. हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यातील अनेक क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. प्रशिक्षक जस्पाल राणा तसेच उत्तराखंडचे माजी क्रीडामंत्री नारायणसिंग राणा यांनी मनुच्या कामगिरीचे कौतुक केले. दिल्लीच्या प्रमुख मार्गावर मनु भाकर आणि जस्पाल राणा यांचे मोठे फलक लावण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप रविवार 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. या समारोप समारंभावेळी होणाऱ्या खेळाडुंच्या पथसंचलनात मनु भाकर भारतीय संघाची ध्वजधारक म्हणून राहणार आहे. शनिवारी मनु भाकर पुन्हा पॅरिसकडे प्रयाण करणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.