For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकर ध्वजधारक

06:40 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकर ध्वजधारक
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

येथे सुरू असलेल्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप समारंभ रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. या समारोप समारंभावेळी विविध देशांच्या क्रीडापटूंचे पथसंचलन होणार आहे. या पथसंचलनात भारताची महिला नेमबाज मनु भाकर ध्वजधारक म्हणून राहिल.

महिला नेमबाज मनु भाकरने या स्पर्धेत वैयक्तिक 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत दमदार कामगिरी करत कास्य पदक मिळविले आणि तिने पदक तक्त्यात भारताचे खाते उघडले. मनु भाकरने सरबज्योतसिंग समवेत 10 मी. एअरपिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात आणखी एक कास्यपदक पटकाविले. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये भारतातर्फे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळविणारी मनु भाकर ही एकमेव खेळाडू आहे. या कामगिरीची दखल घेऊन या स्पर्धेच्या रविवारी होणाऱ्या समारोप समारंभावेळी क्रीडापटूंचे पथसंचलन आयोजित केले आहे. या पथसंचलनात मनु भाकर भारतीय तिरंगासह देशाचे नेतृत्व करेल. या स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला तिसरे कास्यपदक मिळवून दिले आहे. भारतीय पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेत पदकाच्या समिप आपली वाटचाल केली आहे. भारतीय हॉकी संघाने उपांत्यफेरी गाठली आहे. या स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकाराला आज प्रारंभ होत आहे. भारताची महिला मल्ल निशा दाहीया 68 किलो गटात सहभागी होत आहे. तर पुरूषांच्या भालाफेक प्रकाराला मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार असून विद्यमान ऑलिम्पिक विजेता निरज चोप्रा याच्याकडून मोठी अपेक्षा पुन्हा बाळगली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.