For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू, अनिश यांचा सलग दुसरा विजय

06:01 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू  अनिश यांचा सलग दुसरा विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथील डॉ. कर्नीसिंग नेमबाजी संकुलात सुरु असलेल्या ऑलिम्पिक निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत पात्र फेरीमध्ये भारताच्या मनू भाकर आणि अनिश बनवाला यांनी आपला सलग दुसरा विजय नोंदविला.

महिलांच्या 25 मी. पिस्तुल टी-2 पात्र फेरीमध्ये मनू भाकरने सरासरी 585 गुण नोंदवित पोल पोझिशन पटकाविले. मनू भाकरने शनिवारी या स्पर्धेत टी-1 पात्र फेरीमध्ये आपला पहिला विजय नोंदविला होता. या क्रीडा प्रकारात इशा सिंग 581 गुणासह दुसऱ्या तर सिमरनप्रीत कौर 577 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत.

Advertisement

पुरुषांच्या 25 मी. रूपिड फायर पिस्तुल नेमबाजीत टी-2 पात्र फेरीमध्ये अनिश बनवालाने 582 गुणांसह पहिले स्थान घेत आपला दुसरा विजय नोंदविला. या क्रीडा प्रकारात भारताच्या विजयवीर सिद्धूने 580 गुणांसह दुसरे स्थान तर भावेश शेखावतने तिसरे स्थान घेतले. आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी महिलांच्या पिस्तुल नेमबाजी प्रकारात मनू भाकर आणि ईशा तर पुरूषांच्या विभागात अनिश आणि विजयवीर यांच्यात चुरस राहिल.

Advertisement
Tags :

.