For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणतुर्गा-गावठाण रस्ता आमदार निधीतून

12:02 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मणतुर्गा गावठाण रस्ता आमदार निधीतून
Advertisement

खानापूर : मणतुर्गा गाव ते गावठाण रस्त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता व्हावा यासाठी पंच आणि ग्रामस्थ प्रयत्नशील होते. या रस्त्यासाठी अमृत शेलार, सुधीर पाटील, नारायण पाटील, अनंत पाटील यासह संपूर्ण पंचकमिटी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत अधिकारी यासह मनरेगा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे रस्ता करून देण्यात यावा, यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच मणतुर्गा ते गावठाण वसाहत हा रस्ता पूर्णत्वास गेला असल्याचे पंचकमिटीने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

Advertisement

मणतुर्गा गाव ते गावठाण वसाहतकडे जाणारा रस्ता हा शेतातून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत होते. मात्र वसाहतीला रस्ता आवश्यक असल्याने गावच्या पंचकमिटीत रस्ता करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला होता. यासाठी गेल्या वर्षभरापासून सरकारदरबारी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता. जवळपास पाचशे मीटर रस्त्यासाठी आमदार निधीतून 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून अर्धा कि. मी. मेटलिंग रस्ता आणि गटार तयार करण्यात आले आहे. मात्र उर्वरित रस्त्यासाठी काही शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र यावरही तोडगा काढण्यात आला होता.

तसेच उर्वरित रस्ता हा मनरेगा माध्यमातून करण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी राहूल शिंदे यांना भेटून पंच मंडळीच्यावतीने रस्त्याचे काम मनरेगातून करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश तहसीलदारांना दिले होते. त्यामुळेच रस्त्याबाबत तोडगा निघाला असून उर्वरित रस्ता आणि आवश्यक असणारी सिडी वर्कसाठी आमदार फंडातून निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे पंचमंडळीनी यावेळी सांगितले. सध्या आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या निधीतून 25 लाख खर्च करून गटार आणि मेटलिंग रस्ता करण्यात आलेला आहे. उर्वरित रस्ताही येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.